Ticker

6/recent/ticker-posts

अंबड पोलीसांची अवैधरित्या गैणखणिज वाळुचे उत्खनन करुन चोरी करणारे वाळुमाफीयावर कारवाई



 *55 लाख रुपयाचा मुद्देमाल केला जप्त* 

अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

पोलीस ठाणे अंबड हद्दीत दि.07/05/2025 रोजी  मठपिंपळगाव शिवारातील दुधना नदीपात्रात काही लोक हायवा व जेसीबीद्वारे अवैधरित्या गैणखणिज वाळुचे उत्खनन करुन चोरी करत असल्याची माहीती मिळाल्याने सदरबाबत कारवाई करणेकामी पोलीस ठाणे अंबड प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक अमोल गुरले व पोउपनि भगवान नरोडे,पो.ह.1272 दिपक चव्हाण,पो.शि 344अरुण मुंडे पो.शि.626 भानुसे असे रात्री 02.30 वाजताचे सुमारास वाळु माफीयांना चकवा देण्यासाठी एक बैलगाडी तात्काळ उपलब्ध करुन अडचणीच्या रस्त्याने मठपिंपळगाव शिवारात दुधाना नदीपात्रात अचानक छापा मारला असता सदर ठिकाणी एक हायवा,एक मिनी हायवा व एक जे.सी.बी असा एकुण 55 लाख रुपयेचा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आलेला आहे.

सदरबाबत पो.ठाणे अंबड येथे गु.र.क्र.240/2025 कलम 303(2),62,3 (5) भा.न्या.सं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कामगीरी मा.श्री अजय कुमार बंसल पोलीस अधिक्षक जालना,मा.श्री अयुष नोपाणी अप्पर पोलीस अधिक्षक जालना,मा.श्री विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे अंबड प्रभारी अधिकारी अमोल गुरले सहा-पोलीस निरीक्षक, पोउपनि भगवान नरोडे,पो.हे.कॉ दिपक पाटील, पो.कॉ.अरुण मुंडे,भानुसे,स्वप्निल भिसे यांनी कार्यवाही पार पाडलेली आहे.