Ticker

6/recent/ticker-posts

नांदेडचा भारतीय जवान शहीद.



गणेश कदम बिलोली प्रतिनिधी. 

काश्मीरमध्ये नांदेडच्या देगलूर तालुक्यातील सुपुत्राला वीर मरण आले आहे. देश सेवेचे कर्तव्य बजावत असताना, देगलूर तालुक्यातील तमलूर गावची सुपुत्र, हुतात्मा सचिन यादव वणंजे यांचे श्रीनगर जवळील तंगधर परिसरात लष्करी वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन दरीत कोसळले. याच अपघातात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात पत्नी, अवघ्या आठ महिन्याची कन्या, दोन भाऊ, आई- वडील असा परिवार आहे.