यावल प्रतिनिधी (रविंद्र आढाळे)
येथील उपविभागीय बांधकाम विभाग कार्यालयातील विभागीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे तालुक्यातील विविध समस्या प्रलंबित असल्याकारणाने भीम आर्मी कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना उफाळून आल्या व याचा निषेध नोंदवण्यासाठी आज दि.२६ मे सोमवार रोजी भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या वतीने रिकाम्या खुर्चीला हार घालून एक अनोखा निषेध नोंदविण्यात आला.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्ते उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात जात होते मात्र अधिकारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला होता.
अधिकारी वेळेवर येत नाहीत पण त्यांची खुर्ची तरी नेहमी जागेवर असते म्हणून तीच ‘प्रामाणिक’ असल्यामुळे तिचाच सत्कार करायचा ठरवल” अशी उपरोधिक प्रतिक्रिया गणेश सपकाळे यांनी दिली आहे.यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर,आकाश बिऱ्हाडे,सागर मेघे,विक्की तायडे,विशाल वाघमारे यांची उपस्थिती राहिली.सदर प्रकार सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियावर या ‘खुर्ची सत्कार’चे फोटो व व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.अनेकांनी यावर हा स्वागत होता की टीका असा सवाल उपस्थित केला आहे.





Social Plugin