बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ]
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फडतरवाडीची बुधची माजी विद्यार्थिनी आणि जिल्हा परिषद ठाण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग श्री.अविनाश फडतरे यांची पुतणी व सौ व श्री.रोहिणी कृष्णात फडतरे या शिक्षक दांपत्याची कन्या कु.सई रोहिणी कृष्णात फडतरे हिने छत्रपती शिवाजी विद्यालय वडूज येथून इयत्ता दहावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 99 टक्के गुण मिळवून दैदीप्यमान यश संपादन केले आहे. लहानपणापासूनच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेऊन त्यामध्ये आपल्या बुद्धीची चूणूक दाखवलेली होती त्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धा तालुकास्तर जिल्हास्तर विविध प्रथम क्रमांकाचे बक्षीस तिने मिळवलेली आहेत की ज्यामध्ये सन २०१८-१९ प्रश्नमंजुषा जिल्हास्तर प्रथम क्रमांक,
कोरोना कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी निबंध लेखन स्पर्धेत तालुका जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक बक्षीस आणि पारितोषिकाची मानकरी ठरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त दरवर्षी 7 नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने तालुका आणि जिल्हास्तरावर निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाते त्यामध्ये सलग तीन वर्ष ती जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन निबंध स्पर्धेत सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाची मानकरी.छत्रपती राजर्षी शाहू जयंती निमित्त घेण्यात येणार आहे सारथी निबंध स्पर्धेत सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक.इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्तीधारक जिल्हा परिषद सातारा यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा विभाग जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळवून 21 हजाराचे रू पारितोषिक मिळवले आहे.
तसेच इयत्ता नववी आणि दहावी मध्ये शासकीय चित्रकला स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये तिने सलग दोन वर्ष A ग्रेड मिळवून यश संपादन केले आहे. तिच्या या यशामध्ये तिला लाभलेले गुरुजन श्री. अशोक गणपत सावंत सर, श्रीमती. रत्नमाला शिरोळे मॅडम आणि दिलीप पवार सर यांचे आत्ता पहिली ते चौथीपर्यंत मार्गदर्शन लाभले तसेच इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच आई वडील आजी आजोबा गावातील ग्रामपंचायत सरपंच आणि त्यांचे सहकारी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आणि त्यांचे सहकारी सर्व ग्रामस्थांच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.





Social Plugin