Ticker

6/recent/ticker-posts

वढवी येथील आप्पास्वामी विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल



डॉ.गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

कारंजा : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यामध्ये वढवी येथील आप्पास्वामी विद्यालयाचा १०० टक्के असा उत्कृष्ट निकाल लागला आहे.

विद्यालयातील ४१ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ३६ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी, प्रथम श्रेणी ३, द्वितीय श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतून प्रथम क्रमांकश्रुती प्रदिप ठोकळ ८९.४०. टक्के, द्वितीय जयश्री महादेव कदम ८९.२० टक्के तृतीय क्रमांक छाया समाधान काकडे ८८.८० टक्के हिने पटकावला आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.