बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यात गेली पाच ते सहा दिवस सुरु असलेल्या पावसामुळे राजापूर येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयाची भिंत काल दुपारी पडल्यामुळे पासष्ट हजाराचे नुकसान झाले आहे .
राजापूर ग्रामपंचायत कार्यालय हे स्वत : च्या मालकीची इमारत नसल्यामुळे महसुलच्या चावडीच्या इमारतीमध्ये आहे . जुन्या काळातील इमारत असल्यामुळे पावसाचे पाणी भिंतींत गळाल्यामुळे भिंत पडली . त्यामुळे कार्यालयात असणारा संगणक व दोन प्रिंटर चे पासष्ट हजाराचे नुकसान झाले आहे . चावडीची जागा ग्रामपंचायतीस मिळावी , अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे .





Social Plugin