मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मेडशी मुंगळा रस्त्यावर गोकसांवगी पुलाजवळ एक नर जातीचा रोही अंदाजे वय एक वर्ष पेक्षा जास्त जख्मी अवस्थेत असून त्याच्या मागे मोकाट कुत्र्यांचा कळप मागावर असून लचके तोडत असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संदिप डाखोरे यांनी दूरध्वनी द्वारे दिली.वन विभागाच्या पथकाने अतीशय तडकाफडकी घटनास्थळी दाखल होऊन जखमी रोहीचा शोध घेतला.व त्यास कोणतीही इजा न होऊ देता अतिशय जबाबदारीने, व जोखिमने पकडून मेडशी येथील पशू वैद्यकीय दवाखाना येथे आणले. अतीशय गंभिर दुखापत झाल्याने तो रोही मरण यातना सहन करत होता.
याची जाणीव होताच पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकाने त्याच्यावर तातडीने योग्य ते उपचार केले.या मध्ये पशू वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश साठे ह्यांच्या सह सुभाष पवार,राधेश्याम घुगे,विशाल सरकटे,समीर रेघिवाले हे होते.तसेच ज्यांनी त्या जख्मी अवस्थेत असलेल्या रोहिला अतीशय जोखीम पत्कारून पकडुन आणले.त्यामध्ये मंगेश वाणी वनरक्षक व प्रवीण ठाकरे, पांडुरंग कालापहाड, राम पवार,संतोष ठाकरे हे होते.तसेच आपदा मित्र अजिंक्य मेडशीकर ह्यांनी सुद्धा ह्या मध्ये वनविभाग व पशू वैद्यकीय विभाग ह्यांना मदत केली.





Social Plugin