बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
अटकळी येथील किशोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून या परीक्षेत एकूण 42 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 22 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले असून त्यापैकी दहा विद्यार्थ्यांना 80 टक्के पेक्षा जास्त गुण आहेत 14 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व सहा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत शाळेतून सर्वप्रथम कुमारी सरस्वती मारुती मेहेत्री हिला ८६ टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आली व तसेच सर्व द्वितीय कुमारी ऋतुजा बालाजी पांचाळ हिला 85.80% गुण घेऊन सर द्वितीय आली तर तृतीय अनिरुद्ध संजय शिलगिरे याला 85% गुण मिळवून सर्व तृतीय आला आहे या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकाचा शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश्वर आटकळे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री माधवराव पाटील शेळगावकर साहेब व सचिव श्री संजय पाटील शेळगावकर साहेब यांनी विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहेत.
Social Plugin