देगलूर- प्रतिनिधी- जावेद अहेमद
सगरोळी येथील राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाने स्थापनेपासूनच माध्यमिक शालांत (SSC) परीक्षेत गेल्या २४ वर्षापासून १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षी आपल्या गुणवत्तेची आणि शिस्तीची विजयी पताका फडकावली आहे. या २०२४-२०२५ वर्षी एकूण ५० पैकी ४३ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत आणि 7 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले, यामध्ये विशेषत्वाने प्रथमेश नरसिंग कामशेट्टे याने 100% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून विद्यालयाच्या इतिहासात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांचेच वर्गमित्र कृष्णकांत साईनाथ बोडके – 96.80% द्वितीय क्रमांक ️व अनंत अविनाश पंदिलवार – 96.20% तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या यशामुळे सर्वत्र कौतुकाची लाट उसळली आहे.
यासोबतच संस्थेच्या श्री. छ. शिवाजी हायस्कूल मधील प्राची कोदळे हिने ९८.८ गुण मिळवत विद्यालयात प्रथम तर सुप्रिया परसुरे ९६.८ गुणांसह द्वितीय व गायत्री पांचाळ हिने ९५.८ गुणांसह तृतीय स्थान मिळवले. एकूण ३०३ विद्यार्थ्यांपैकी २८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९५.३७ टक्के शाळेचा निकाल आला आहे.
विद्यार्थ्यांच्या यशामागे असलेल्या कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध अभ्यासपद्धतीचा मोठा वाटा असल्याचे विद्यालयाने नमूद केले आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Social Plugin