Ticker

6/recent/ticker-posts

श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूलचा निकाल १००%घोषित



*एकूण ८२ विद्यार्थ्यांपैकी ६५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत*

अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ 

 अंबड येथील श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूलचा निकाल १००% लागला असून शैक्षणिक वर्ष २४-२५ मध्ये शाळेत एकूण ८२ विद्यार्थ्यांपैकी ६५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून १३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे.तर ०४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

या परीक्षेत प्रथम गौरी वावरे ९८.८०%, द्वितीय जयकिर्ती अग्रवाल ९७.००%,तृतीय क्रमांक शेळके हर्षदा ९६.८०% व वैराळ तेजस्विनी ९६.८०% गुण मिळवले असून या निकालात गणित विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे आठ विद्यार्थी असून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार कासलीवाल,डॉ.रमेशचंद्र गंगवाल, शिरीष सावजी,प्रवीण बाकलीवाल,संजय चांदीवाल,सुरेश दिडपोळे,डॉ.राजेंद्र भाला,डॉ.नरेश अग्रवाल,डॉ.संतोष मोहळे,चंद्रप्रभू दिडपोळे,संजय इंचूरे,मुकेश सावजी,संतोष बाकलीवाल,दिपक पाटणी,भूषण काला,डॉअनिल पांडे,दिलीप बुर्ले तसेच शाळेचे मुख्याध्यापक एन.एस.भारद्वाज व शिक्षकवृंद,पालक आदींनी अभिनंदन केले.