Ticker

6/recent/ticker-posts

जनसामान्यांची अडवणूक करू नका - आ. भावनाताई गवळी यांनी



शासकिय योजनांची घेतली आढावा बैठक 

पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा (लाड )महायुती सरकारने सामान्य माणूस केंद्रस्थान मानून विविध लोककल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. मात्र काही अधिकारी व कर्मचारी या योजनांच्या लाभापासून सामान्य माणसाला वंचित ठेवत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात कुणाची ही गय केली जाणार नाही. त्यामुळे यापुढे शासनाच्या कल्याणकारी योजनने पासून कुणीही वंचित राहू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश आमदार भावनाताई गवळी पाटील यांनी दिले. नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी २५ एप्रिल रोजी स्थानिक पंचायत समितीमधील स्व. प्रकाशदादा डहाके सभागृहात शासकीय आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

या बैठकीला तहसीलदार, ठाणेदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, रोजगार सेवक, महसूल मंडळ अधिकारी आणि इतर प्रमुख अधिकारी, शिवसेना जिल्हाप्रमुख विजु खानझोडे, जिल्हा संघटक अनिल गरकळ, ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. ढगे साहेब, सूतगिरणीचे संचालक सुरेश दवंडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली येळणे, उपतालुकाप्रमुख सुरेश तुरक, राज चौधरी, दिलीप भोजराज, सुधाकर गर्जे, शहर प्रमुख अरुण बिकड, चैतन्य पाटील, अजय मते, शुभम भोयर, तसेच शिवसेना पदाधिकारी हे उपस्थित होते.

या बैठकीत आ. गवळींनी विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावा घेतला. तसेच योजनांमधील अडचणी समजून घेतल्या आणि स्थानिक समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यावर भर दिला. जल जीवन मिशन योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. जल जीवन योजनेअंतर्गत किती घरांना पिण्याचे पाणी मिळाले, आणि जलतारा योजनेची चालू असलेली अंमलबजावणी याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली