Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड जिल्ह्यासाठी गौरवाची बाब! संतोष पाटील यांची ‘राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघ’ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती



देगलूर - प्रतिनिधी- जावेद अहेमद                     :

 नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायक अशी बातमी समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामविकास आणि पंचायत राज व्यवस्थेला दिशा देणारे एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले सरपंच संतोष पाटील यांची ‘राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघ, नवी दिल्ली’ यांच्या वतीने नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सरपंच संतोष पाटील यांनी आजवर ग्रामविकासासाठी झपाटून काम करत स्थानिक पातळीवर सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण दृष्टिकोनामुळे आणि लोकसहभाग वाढविणाऱ्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी पंचायतीच्या विकासाला एक नवी दिशा दिली आहे.

ही नियुक्ती ही केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी एक सन्मानाची आणि प्रेरणादायक बाब ठरली आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली संघटना अधिक सक्रिय, सक्षम आणि परिणामकारक होईल, असा विश्वास संघटनेच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या नियुक्तीबाबत राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले, राज्य प्रभारी सुनिल पाटील, सह-प्रभारी रवी पाटील, महासचिव प्रा. नितीन ताथोड, कार्याध्यक्ष प्रा. अरुण देवडे, संघटक रमेश गडदे, महिला विभाग प्रमुख सौ. सुनिता सुतार, तसेच इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संतोष पाटील यांनी या नियुक्तीमागील विश्वासाला न्याय देत, "संघटनेच्या धोरणानुसार पारदर्शकता, इमानदारी आणि निस्वार्थ भावनेने कार्य करत, नांदेड जिल्ह्याचा विकास आणि पंचायत राज व्यवस्थेचा सशक्तीकरण हाच माझा मुख्य उद्देश राहील," असे ठामपणे सांगितले.

या नियुक्तीमुळे नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना नवे बळ, दिशा आणि गतिशील नेतृत्व मिळाल्याची भावना जिल्हाभरातून व्यक्त होत आहे.