Ticker

6/recent/ticker-posts

बक्तरपुर येथील भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न.



प्रतिनिधी:- मोहन जाधव.

चास (नळी):- कोपरगांव तालुक्यातील बक्तरपुर येथील सर्वज्ञ क्रिकेट क्लब आयोजित, भव्य हार्ड टेनिस बॉल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करुन शनिवार दि.१७/०५/२०२५ रोजी सकाळी ९ वा. स्पर्धेचा शुभारंभ  करण्यात आला. तसेच या स्पर्धा खेळण्यासाठी नाशिक, सिन्नर, वडांगळी, कोळगाव, कानळद, येवला, सत्यगाव, मुखेड, वाकद (शिरवाडे),  कोळपेवाडी, चास (नळी), वडगांव, राहुरी, सर्वत्र परिसरातून भरपुर क्रिकेट प्रेमी खेळण्यासाठी आणि मनोरंजक सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले होते. सर्व झालेल्या सामन्यातून अंतिम सामन्यासाठी ५ संघाची निवड करण्यात आली होती. या निवड झालेल्या संघाना दि.२५ मे २०२५ रोजी रोख रक्कम व ट्रॉफीचे वितरण करण्यात आले. सर्व झालेल्या सामन्यातून प्रथम संघ नाशिक ११ साहेबराव सानप यांच्या हस्ते रोख बक्षीस ३१,००० हजार रु. व ट्रॉफी, द्वितीय संघ सर्वज्ञ क्रिकेट क्लब बक्तरपूर बाबासाहेब सानप यांच्या हस्ते बक्षीस २१, ००० रु.व ट्रॉफी, तृतीय संघ जगदंबा ११ सिन्नर प्रविण सानप व सचिन सेठी यांच्या हस्ते रोख रक्कम ११,००० रु. व ट्रॉफी, चतुर्थ संघ मोरया ग्रुप कानळद किरण सैंद यांच्या हस्ते रोख रक्कम ७,००० रु. व ट्रॉफी आणि पाचवा संघ शनेश्वर क्रिकेट क्लब अलकाबाई बोडखे यांच्या हस्ते रोख रक्कम ५,००० रु. आणि ट्रॉफी चे वितरण करण्यात आले होते.

 खेळाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन आपले कला गुण सादर केले. आणि आपल्या संघाना विजयी करण्यात महत्वाची भूमिका बजावली तसेच खेळाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक जीवनशैली बदलून टाकण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. व्यक्तिगत जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. सदर क्रिकेट स्पर्धा पूर्ण करण्यासाठी विशेष सहकार्य सर्वज्ञ क्रिकेट आयोजक माणिक गरुड, प्रवीण सानप, तुषार गरुड, मयुर सानप, अक्षय गरुड, वैभव सानप, विशाल गरुड, ओमकार सानप, आकाश बोडखे, विशाल बोडखे, रवी पवार त्याचप्रमाणे विशेष सहकार्य सुभाष गरुड, कृष्णराव सानप, गणेश बुरकुल, संपत गरुड, चेतन बोडखे, कृष्णा शेळके, विश्वास बोडखे, जगन सानप, गोवर्धन सानप, डॉक्टर मुकुंदा सानप, कुणाल कांगणे, भारत  जेजुरकर, आनंद कृषी सेवा केंद्र व समस्त बक्तरपुर युवा टीम तसेच गावचे सरपंच, उपसरपंच आणि पोलीस पाटील तसेच गावातील ज्येष्ठ मंडळीचे मोलाचे सहकार्य लाभले.