Ticker

6/recent/ticker-posts

पोलिस आणि पत्रकारांनी लावली माया आणि माया बोलती झाली....



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा ते घनर्ज रोडवर कारंजा पासून चार किलो मिटर अंतरावर एक पंधरा वर्षीय मुलगी अनवाई पायाने धनज कडे जात होती मागून महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिलाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले आपल्या गावी जाताना त्यांनी दिसली मुलीला विचारणा केली असता मुलगी काहीच बोलत नव्हती ती रस्ता भुलली असावी आणि फिरून फिरून थकली असावी असा आदांज आल्याने प्रथम तिला विश्वासात घेऊन रस्त्यावरील चकरधर वडी जवळ बसविले आणि या कामी नेहमी तत्पर असणारे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना फोन करून तिला घेऊन जाण्यासाठी सांगितले मात्र ते रुग्णाला घेऊन यवतमाळ ल असल्याने त्यांना ते शक्य नव्हते त्यामुळे श्याम सवाई यांना कॉल केला त्यांनी त्यावर शासकीय सेवा असलेली 112, आणि 108 या सरकारी सेवा. आणि त्यांना कॉल करण्याचं सांगितले त्यानंतर या सेवेत 108या पोलिस सेवेत संपर्क केला

लगेच त्यांनी सदर बाब लक्षात घेता कारंजा ग्रामीण आणि कारंजा शहर दोन्ही पोलिसात याबाबत सूचना करून मुलीला मदत देण्याबाबत कळविले त्यानंतर ग्रामीण पोलिसांकडून महीला पोलिस नसल्याने थोडा उशीर लागेल तुम्ही थाबा आम्ही येत आहोत असा संदेश मिळाला तर कारंजा शहर पोलिसांकडून आम्ही निघालो पाच मिनिटात पोहचतो असा संदेश आला यावरून या सेवा तत्पर बाबत समाधान वाटले 10 मिनिटात दोन्ही पोलिसांच्या गाड्या पोहचल्या सुरवातीला पोलिसांना पाहून मुलगी बोलत नव्हती तेव्हा तिच्या शेजारी बसून टीका मायने विचारपूस केली तेव्हा तिने तिचे नाव माया अनिड कोडापे रां काजलेश्वर असून तिची बहीण कारंजा ग्रामीण

पोलीस स्टेशन च्य बाजूला असलेल्या झिपद्यात राहते असे सांगितले त्यावरून ग्रामीण पोलीस स्टेशन कडून आलेल्या पोलिस अनिल मुंढे 701, पो. को. दिलीप देवकर 1408 यांनी शहर पो महीला पौर्णिमा मोठे 696, कॉ. मोहम्मद परसूवाले 1374, कारंजा शहर पोलीस याचे कडे सोपविली या दोन्ही पोलिसांनी आपले कर्तव्य आणि जबाबदारी लक्षात घेऊन दाखविली तत्पता ही पोलिसावर अधिक विश्वास वाढविणारी आहे पोलिस पत्रकार यांनी मायेने विचारपूस करून डोक्याने कमी असलेल्या मायेला सुखरूप तिच्या नातेवाईक कडे सोपविली पोलिसांच्या तत्परतेबद्दल उपस्थित असलेल्या माजी सरपंच हरीश बलग आणि मोखड पिप्री येथील आभाराचे भाव व्यक्त केले