पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि
भाजपा पक्ष शहरच्या वतीने २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने स्थानिक विश्रामगृह येथे एक बैठक घेण्यात आली.
शहर अध्यक्ष प्राजक्ताताई माहितकर अध्यक्षतेखाली यांच्या स्वा. सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रदेशसदस्य विजय पाटील काळे यांनी स्वा. सावरकरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी कारंजा - मुर्तिजापूर बायपास
चौकातील चौकाचे स्वा. सावरकर सौंदर्या करण करण्याची मागणी करण्यात आली. बैठकीनंतर लगेच चौकात जाऊन साफसफाई करण्यात आली. यावेळी भाजप बूथ अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते. मोहन पंजवानी यांचे हस्ते फलकाला हारार्पण करण्यात आले. यावेळी कारंजा ब्राम्हण सभेचे अध्यक्ष प्रसन्ना पळसकर व हभप श्विनीताई सस्तकर यांचेसह संदीप काळे, सागर आवटे, भुपेंद्र हरिहर, आदर्श उटाळे, रोहित सम्रत व नागरिक उपस्थित होते





Social Plugin