Ticker

6/recent/ticker-posts

शेततळ्यात बुडून तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू ; जाफराबाद तालुक्यातील कोनड शिवारातील घटना.



टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर 

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील कोनड शिवारातील एका शेततळ्यात बुडून तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 3 जून रोजी सकाळी उघडकीस आली.  या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.  

याबाबत अधिक माहिती आशि की जाफराबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथील जोशी कुटुंब हे सोमवार दिनांक 2 जून रोजी डोलखेडा येथील ओलांडेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेलेले होते. यावेळी कुटुंबातील  यश अनिल जोशी ( 14 ), दिपाली रमण जोशी  ( 9 ), रोहण रमण जोशी  ( 7 ) ही तीन भावंडे बेपत्ता झाली होती. त्यांच्या नातीवाईक व  कुटुंबियांनी  त्यांचा सर्वत्र शोध घेतला होता परंतु ये तीनही भावंड सापडली नाही,

दरम्यान, मंगळवारी सकाळी कोनड शिवारातील सुभाष परिहार यांच्या शेतातील शेततळ्यात या तिन्ही भावंडाचे मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिक शेतकर्‍यांना आढळून आली.  याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान ही मुले भोकरदन येथील संतोष शास्त्री यांच्या मेव्हण्याची होती, शिवाय  काही वर्षांपूर्वी भोकरदन पोष्ट ऑफिस परिसरात राहणाऱ्या जोशी साहेब लाईनम यांची नातवंड होतं,या घटनेमुळे  सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

     दरम्यान,  ही तिन्ही भावंडे या शेततळ्यावर कशी गेली, त्यांचा मृत्यू कसा झाला याबाबत अद्याप काहीही समोर आलेले नाही.  जाफराबाद पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.