Ticker

6/recent/ticker-posts

जि.प.पांगरखेड शाळेच्या विद्यार्थिनिंचे राज्यस्तरीय गीत स्पर्धेत सुयश



साहेबराव अंभोरे @ग्रामीण प्रतिनिधी 

मेहकर - पांगरखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील कु. सृष्टी सुधाकर हिवराळे व कु. सृष्टी उमेश सुर्वे या विद्यार्थींना राज्यस्तरीय गीतस्पर्धेमध्ये प्रोत्साहनपर पुस्तकरूपी बक्षीस मिळाले आहे.सदर विद्यार्थीनींनी अगदी काही दिवस अगोदर StarMaker या सिंगिंग ॲप च्या माध्यमातून आपली गीते सादर केली. या ॲपच्या सर्व टेक्निकल बाबी या नवख्या विद्यार्थीनींनी पूर्ण करून आपली गीते सादर केलीत हे विशेष.

कु.सृष्टी हिवराळे व कु.सृष्टी सुर्वे या दोघींनी नांदन नांदन होतं रमाचं नांदनं हे कराओके गीत सादर केले होते. त्यांचे बक्षीस टपालाने त्यांना घरपोच मिळाले. सदर पुस्तक रुपी बक्षीस त्यांना जनुना केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन काळे व मुख्याध्यापक सुकनंदन हांडे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन प्रदान करण्यात आले. या स्पर्धेसाठी त्यांना पदवीधर तथा संगीत शिक्षक साहेबराव अंभोरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय आखाडे, राजेंद्र राऊत, सहाय्यक तथा तंत्रस्नेही शिक्षक भिमराव सदार, सहायक शिक्षिका छाया सातपुते, शिक्षण तथा आहार तज्ज्ञ विष्णू गांजरे उपस्थित होते.

    या ऑनलाईन गीतस्पर्धेमुळे आमचा आनंद, आत्मविश्वास वाढला अशी विद्यार्थ्यांची बोलकी प्रतिक्रीया होती. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 स्टारमेकर या सिंगिंग कराओके ॲपवर 'बुद्ध आणि त्यांचा धम्म ' या ग्रूप मधील संघपाल तेलसे व टीम मार्फत दरवर्षी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.भिमगीत स्पर्धा पुरुष, महिला व लिटिल चॅम्पस या तीन गटात घेण्यात येते. यानिमित्ताने नवोदित कलाकारांना एक नवा मंच, आनंद, आत्मविश्वास मिळतो हे मात्र खरे. सृष्टी हिवराळे व सृष्टी सुर्वे यांना तो मिळाला.