अलिबाग(रत्नाकर पाटील)
देशातील आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्याचे आौचित्य साधून केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनुसार संविधान हत्या दिवस 2025 निमित्ताने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आणीबाणीच्या काळातील लोकतंत्र सेनानींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मान पत्र प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आयोजित कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.
या चित्रमय प्रदर्शनात पुरातन काळापासून भारतात सुरू असलेली लोकशाही व्यवस्था, लोकशाही परंपरेनुसार यात असलेला लोकांचा सहभाग व दृष्टीकोण, लोकशाहीचे तत्व, भारतीय परंपरा आणि सामुहिक भागीदारीने चालविण्यात आलेले शासन, ग्रामीण आणि शहरी भागातील जमीन स्तरावरील लोकशाही व्यवस्था, स्वतंत्र भारत आणि लोकशाही प्रणाली, आणीबाणीपूर्व व पश्चात भारतीय समाजव्यवस्था, आणीबाणी लावल्यानंतर प्रसिध्द झालेले राजपत्र, प्रसारमाध्यमांवरील निर्बंध, सरकारच्या विरोधात जनआंदोलन, आणीबाणी संपल्यानंतर लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी उचलण्यात आलेली पाऊले आदींचा यात समावेश करण्यात आला आहे.
आणीबाणीत तुरंगवास भोगलेल्या लोकतंत्र सेनानीना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यात गिरीष तुळपुळे, नंदकुमार चाळके,विलास तोडकर,दामोदर देवधर,शांताराम तांडेल,शंकर तुरे,विश्वास मुळये,नरेंद्र जाधव श्रीवधर करमरकर,नारायण म्हात्रे,विजय घाडगे,सदानंद कर्णेकर,अनिल आचार्य,नथुरामा गायकर,मधुकर खोत,रघुनंदन देशपांडे,जयंत भाटे,प्रमिला कुलकर्णी (सौ. मिनल सोमण),नारायण दळवी,प्रल्हाद भाटे,विनायक गद्रे,सुधिर महाजन, पदमाकर पिंपुटकर, त्रिंबक पुरोहीत,दत्तात्रेय साळुंखे,सरिता गांधी,श्रीम. सुरेखा रत्नाकर कोलते (पत्नी),अलका जाधव,सौ. अलका पाटील,राजन ठाकूर, महेश्वर देशमुख,सौ. निला तुळपुळे,हेमंत क-हाडकर,श्रीम. उत्तरा गांगल,अच्युतकोडगीरे,श्रीमती रुचा अरून पाठक (कै. अरुण लक्ष्मण पाठक),अनंत साने,श्रीम. सुषमा भावे,प्रकाश निजामपुरकर,दिनानाथ पोलेकर,श्रीम. शैलेजा साठे यांचा समावेश आहॆ.यावेळी आणीबाणी काळातील लोकतंत्र सेनानींनी आपले अनुभव कथन केले.
Social Plugin