Ticker

6/recent/ticker-posts

अनियंत्रित वाहन उलटले; एक जखमी



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा(लाड ) समोरून भरधाव वेगात आलेल्या वाहनामुळे अनियंत्रित वाहन उलटून एक जण जखमी झाला. जय अशोक चवात (२१, रा. जवळगाव ता. दारव्हा) असे जखमीचे नाव आहे. ही घटना  दुपारी १ वाजताच्या सुमारास स्थानिक स्वातंत्रवीर सावरकर चौकात घडली.

एमएच२९ सीबी ६५७५क्रमांकाचे इको वाहन अमरावती येथून कारंजा मार्गे नेर येथे येत असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या वाहनामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही वाहन रस्त्यावर पलटी झाले. या घटनेत जय चवात हा जखमी झाला. त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले