Ticker

6/recent/ticker-posts

संतोषीमाता कॉलनीतील समस्या निकाली काढू आमदार सईताई डहाके यांचे आश्र्वासन



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 


कारंजा(लाड ) शहराच्या मध्यभागी वसलेल्या संतोषी माता कॉलनीमधील महादेवाच्या मंदिर परिसराची आवारभिंत आणि अन्य समस्या तातडीने निकाली काढू असे आश्वासन आमदार सईताई प्रकाश डहाके यांनी दिले.

२८ मे रोजी स्थानिक संतोषी माता कॉलनीतील राजराजेश्वर मंदिर येथे आमदार सईलाई डहाके यांचा नागरी सत्कार घेण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. सदस्य बालचंद जाधव उपस्थित होते. सर्वप्रथम आ. डहाके यांनी भगवान महादेव मंदिरात दीपप्रज्वलन व पूजन केले. नंतर त्यांचा अरुण देशमुख यांनी सपत्नीक कॉलनीतील अन्य महिलांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी शेट्टे यांनी कॉलनीतील समस्या मांडल्या. प्रास्ताविक भाषणात प्रा. रमेश सांबसकरयांनी देखील कॉलनीतील समस्या मांडताना भगवान आमदार सईताई डहाके यांचे आश्वासन महादेव मंदिराच्या खुल्या जागेला पुर्ण आवारभिंत देण्याची मागणी केली. तसेच कॉलनीतील काही रस्ते व नाल्या, पथदिवे आदी प्रश्नांवर प्रकाश टाकला. यावर आमदार सईताई डहाके यांनी या समस्या लवकरच दूर करण्याचे आश्वासन दिले

संचालन राठोड सर यांनी केले कार्यक्रमाला कॉलनीतील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते