पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि
कारंजा(लाड ) येथून जवळच असलेल्या ग्राम यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयात पालक व विद्यार्थ्यांसाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते सदर शिबिराला पालकसह विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक विजय भड यांनी सांगितले की, सोमवार पासून प्रत्यक्ष अकरावी प्रवेशाचा अर्ज व प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात होणार आहे. यंदा प्रथमच अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइनसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, कॉलेज निवड, ऑनलाइन प्रणाली, प्रवेशाच्या गुणवत्ता यादीसह इतर महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले





Social Plugin