अलिबाग, (रत्नाकर पाटील)
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सहयोग पतसंस्था अलिबाग यांच्या वतीने बेलकडे गावात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण रक्षण व वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम सामाजिक भान जपत राबवण्यात आला.
या कार्यक्रमास रायगड जिल्हा उपनिबंधक श्री.प्रमोद जगताप साहेब, अलिबाग तालुका सहाय्यक निबंधक श्री. श्रीकांत पाटील साहेब यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. त्यांनी पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोग पतसंस्थेचे अध्यक्ष मा.श्री. योगेश मगर होते. त्यांच्या समवेत उपाध्यक्ष श्री.संजय पाटील, संचालक श्री.सुनील तांबडकर, श्री.निळकंठ केमकर, श्री. चिंतामणी मकू, श्री.मोहन वैद्य, कु.श्रावणी मगर, व्यवस्थापक श्री. वैभव बोर्लीकर, तसेच पतसंस्थेचा संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
याशिवाय कार्यक्रमाला बेलकडे गावचे ग्रामस्थ, जिल्हा माजी होमगार्ड समादेशक अॅगड. के. डी. पाटील सर, त्यांचे सहकारी, आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या उपक्रमातून समाजात पर्यावरण रक्षण, हरितनिर्मिती आणि जैवविविधतेचे जतन यांचा संदेश देण्यात आला. आगामी काळात सहयोग पतसंस्थेच्या वतीने असेच अनेक सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष मा. योगेश मगर यांनी दिली.
Social Plugin