Ticker

6/recent/ticker-posts

साहित्यिक रमेश धनावडे यांच्या 'नादखुळा' या पुस्तकाचे प्रकाशन



अलिबाग(रत्नाकर पाटील)

साहित्यिक रमेश धनावडे यांच्या 'नादखुळा' या सहाव्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष  प्रशांत नाईक, अँड.प्रसाद पाटील, कामगार नेते दीपक रानवडे, डॉ. चंद्रकांत वाजे, डॉ. राजेंद्र चांदोरकर,  उद्योगपती अनिल म्हात्रे, चित्रपट निर्माते दिग्दर्शक लेखक नरेंद्र ठाकूर,  नागेश कुलकर्णी, साहित्यिक अँड .विलास नाईक, साहित्यसंपदा चे वैभव धनावडे, पूनम  धनावडे, महेश कवळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

साहित्यसंपदा प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित झाले असून  वैभव धनावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी रमेश धनावडे यांच्या काही निवडक कवितांचे वाचन किरण साष्टे व ज्योती बावधनकर यांनी  केले. तर शुभेच्छापत्र चे वाचन वैशाली भिडे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवर पाहुण्यांची भाषणे झाली यात रमेश धनावडे यांच्या सामाजिक, साहित्यिक व इतर कार्याचा आढावा घेतला गेला

यावेळी बोलताना रमेश धनावडे यांनी नादखुळा पुस्तकाचा प्रवास थोडक्यात कथन गेला.ज्येष्ठ आर्टिस्ट व चित्रकार निलेश जाधव यांनी  मुखपृष्ठ तयार केले  तसेच पुस्तकासाठी प्रस्तावना व ब्लफ ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी लिहिली आहे. पुस्तकाच्या अंतर्गत सजावटीचे काम योगेश राणे यांनी केले मुद्रित शोधनाचे काम महेश कवळे यांनी खूप छान पद्धतीने केले आहे. 

रमेश धनावडे यांचे मनतरंग काव्यसंग्रह, ऊर्मी चारोळी संग्रह, जीवनगाणे ललितलेख संग्रह, कवितेच्या सुरातून हा लेखसंग्रह व असेच काहीतरी ही पुस्तके प्रकाशित आहेत.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कवळे केले.  तसेच या पुस्तकाचे उपस्थित सर्व मान्यवरांनी भरभरून कौतुक केले आहे. असून नादखुळा हे पुस्तक साहित्य क्षेत्रामध्ये भरपूर नावलौकिक मिळवेल असा विश्वास उपस्थित मान्यवर व साहित्य क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अपूर्वा धनावडे, तेजल धनावडे, पार्थ पाटील, राजेश्री पाटील व इतर अनेक जणांनी खूप मेहनत घेतली. यावेळी अलिबाग तालुक्यातील व रायगड जिल्ह्यातील अनेक नामवंत साहित्यिक, सुजाण नागरिक, वाचक, साहित्यप्रेमी  उपस्थित होते.