पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि
कारंजा (लाड ) श्री संत गजानन महाराज हॅण्डबॉल क्लब, कारंजा तथा दि हॅण्डबॉल असो ऑफ वाशिम डिस्ट्रिक्टची आदर्श खेळाडू मोहिनी रविंद्र घाटे हिची भुज (गुजरात) येथ संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या महिला संघात निवड करण्यात आली आहे.
मोहिनी ही नियमितपणे हॅण्डबॉल या खेळाचा सराव श्री संत गजानन महाराज हॅण्डबॉल क्लब तथा हॅण्डबॉल प्रशिक्षण केंद्र तालुका क्रीडा संकुल कारंजाच्या भव्य मैदानावर करते. मोहिनी हीची ही पाचवी राष्ट्रीय स्पर्धा असून श्री संत गजानन महाराज हॅण्डबॉल क्लबच्या शिरपेचात तिने मानाचा तुरा खोवला आहे. दिनांक २२ जून रोजी खारघर येथे राज्यस्तरीय निवड चाचणी मध्ये उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे निवड समितीने मोहिनी हिची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड केली. सदर राष्ट्रीय स्पर्धेचे
प्रशिक्षण शिबिर मुंबई येथे होणार असून दिनांक २८ जून ते ३ जुलै २०२५ दरम्यान भुज गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता संघ रवाना होणार आहे. मोहिनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, प्रशिक्षक दर्शन रोकडे, सनी काळे क्लबचे सचिव राहुल गावंडे यांना देते दरम्यान निवड झाल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे असोसिएशनचे अध्यक्ष देवेंद्र पाटील ताथोड, उपाध्यक्ष विजय पाटील काळे, शहराध्यक्षा सौ प्राजक्ता उमाकांत महितकर, प्रा. सुभाष गावंडे, वसंतराव साबळे, संचालक राजू मते, राजेश अढावू, प्रा. शशिकांत नांदगावकर, शारीरिक शिक्षक विवेक गहाणकरी, श्रीहरी कॉम्पुटर चे संचालक योगेश भोयर, दिनेश पळसकर, उमाकांत माहीतकर, श्रीपाद शिंदे, सदानंद राऊत, सुनील सुडके, संतोष घोटे, प्रज्वल उजवणे, शुभम चौधरी, धीरज डहाके यांनी मोहिनीचे कौतुक केले
Social Plugin