Ticker

6/recent/ticker-posts

बिलोली येथे डाक विभागाची अतिक्रमण हटाव मोहीम



देगलूर प्रतिनिधी - जावेद अहेमद

भारतीय डाक विभाग भारत सरकार यांचे मालकीचे बिलोली नगरपालिका हद्दीतील विभागीय प्लॉटवरील अतिक्रमण हटविण्यासाठी दिनांक 29.07.202 रोजी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.बिलोली नगरपालिका हद्दीतील डाक विभागाच्या मालकीचे प्लॉट मालमत्ता क्रमांक-1176 यावरील अतिक्रमण स्वतः हून काढून घेण्यासाठी डाक विभागातर्फे अतिक्रमण धारकांना प्रत्यक्ष अतिक्रमण ठिकाणी जाऊन सकाळच्या सत्रात सुचित करण्यात आले.

काही  अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घेतले. तसेच बाकीचे अतिक्रमण धडक अतिक्रमण हटाव मोहिमेद्वारे अनधिकृत बांधकाम, अनधिकृत शेड डाक विभागाद्वारे नष्ट करण्यात आले.सदर मोहिम सकाळी 11.00 वाजता सुरू झाली होती ती सायंकाळी 06.30 वाजेपर्यंत संपूर्ण अतिक्रमण काढून पूर्ण करण्यात आली.यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात होता.तसेच बिलोली येथील तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते.डाक विभागाचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.अशी माहिती डाक विभागाच्या नांदेड विभागीय कार्यालयाद्वारे देण्यात आली.