●ग्रामीण प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर
●आदमपूर:बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील मूळचे रहिवासी व सध्या वास्तव्यास काबरानगर,नांदेड येथील भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक तथा नांदेड पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असणारे नागनाथ माणिकराव बासरे हे गुरुवार दि.३१ जुलै रोजी शासन नियमावलीप्रमाणे सेवानिवृत्त झाले आहेत.नांदेड पोलीस मा.अधीक्षक अबिनाश कुमार व पोलीस अधिकारी विभाग यांच्या वतीने सपत्नीक सत्कार करीत निरोप देण्यात आला.
बासरे यांचे प्राथमिक,माध्यमिक शिक्षण जि.प.वरिष्ठ शाळा, आदमपूर,नृसिंह विद्यामंदिर उमरदरी,ता.मुखेड,उच्च माध्यमिक शिक्षण श्री.छञपती शिवाजी महाराज, शारदानगर,सगरोळी वआयटीआय शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय धर्माबाद येथून झाले आहे.पुढे १० फेब्रुवारी, १९८७ साली त्यांची भारतीय सैन्य दलातील टेक्निकल विभागात निवड झाली.आदमपूर गावातून सैन्य दलात निवडले गेलेले ते दुसरे सैनिक आहेत. पायाभूत व तांञिक प्रशिक्षण जबलपूर,मध्य प्रदेश व फोंडा,गोवा या केंद्रातून त्यांनी घेतले आहे.
मद्रास,शांती सेना इन श्रीलंका,चंदीगड,पठाणकोट,हिस्सार(पंजाब/हरियाणा),जोहराट (आसाम),बरेली (उत्तर प्रदेश),देहरादून (उत्तराखंड), जम्मू-काश्मीर,प्रशिक्षण केंद्र फोंडा,(गोवा),आर्मी हेडकाॅर्टर(लष्करी संरक्षण),नवी दिल्ली आदि संवेदनशील प्रांतात त्यांची प्रदीर्घ देशसेवा झाली आहे. युनो तर्फे आयोजित इजराईल व सिरिया देशात शांती व संरक्षण संदर्भाने सहभागी होत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. फेब्रुवारी २०१७ साली सैन्य दलात तब्बल ३० वर्ष सेवा करून ते सुबेदार पदावरून सेवानिवृत्त झाले. अभूतपूर्व कारगिल लढाई,श्रीलंका व संसदेवरील हल्ला आदी लढाईत त्यांचा सहभाग राहिला आहे.
त्यानंतर सन २०१७ साली महाराष्ट्र पोलीस विभाग अंतर्गत नांदेड पोलीस दलात शिपाई म्हणून त्यांची राज्य सेवेत नेमणूक झाली.तब्बल ८ वर्ष सेवा करून गुरुवार दि.३१ जुलै,२०२५ रोजी सेवानिवृत्त निमित्ताने सैन्य विभाग,पोलीस विभाग,गावकरी,पदाधिकारी आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.





Social Plugin