Ticker

6/recent/ticker-posts

मेडशी येथील वैभव बबन साठे याची विद्युत सहाय्यक पदी निवड



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

मेडशी दि :31 अतिशय गरीब परिस्थितीचा सामना करत मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या मेडशी येथील एका गरीब साठे कुटुंबात जन्मलेल्या वैभवने आपल्या शिक्षणाची आवड व जीवनात काही तरी वेगळे करून दाखवण्याच्या जिद्द मनाशी धरून आहोरात्र चिकाटीने अभ्यास व मेहनत करून इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन,मुंबई महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या कडून घेण्यात असलेल्या विद्युत सहायक पदा च्या रंक,२८७३ रोल नंबर ११५०००५१३५ रजि. क्र. ४३११४३९०८अनुसूचित जाती या प्रवर्गातील परीक्षेत यश प्राप्त करून एकत्रित निवड यादी मध्ये आपली निवड निश्चित केले मुळे  वैभवच्या या यशाचे सगळीकडे कुटुंब,नातेवाईकात कौतुक केले जात आहे. वैभव आपल्या यशाचे शौर्य हे आई वडील व कुटुंबातील इतर सदस्य घनशाम रामभाऊ साठे,बबन सिताराम साठे,सचिन दिपक साठे,  mअनुराग घनशाम साठे,  शाम बबन साठे, राम बनन साठे,यांना देत आहे