पाळधी ता.जामनेर :- येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न झाला.यावेळी शाळेच्या समोरील जागेत विविध प्रकारची फुलझाडे लाऊन बगीचा व लॉन तयार करण्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
पाळधी या गावात जिल्हा परिषद शाळेकडे नेहमी गावातील तरुणांनी लक्ष दिले आहे, त्यामुळे गावातील शाळेची संख्या सुद्धा आपल्याला पूर्णपणे आढळून येते ,पाळधी गावात जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय चांगला आहे .
या उपक्रमाचा मुख्य उद्देश शाळांचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे आहे.ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी चांगले वातावरण निर्माण होईल.तसेच शाळेला अधिक सुंदर,सुरक्षित आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनवणे आहे.यासाठी शालेय व्यवस्थापन समिती यांनी या कार्यक्रमांचा पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्य तसेच दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,प्रास्ताविक व आभार गावातील तरुणानीं मानले.





Social Plugin