मालेगाव प्रतिनिधी जावेद भवानीवाले
मालेगाव ता 30 - श्री नाथ नंगे महाराज संस्थान श्री क्षेत्र डव्हा येथे प पू विश्वनाथ बाबाचा जन्मोत्सव ता 29 रोजी नागपंचमीला साजरा करण्यात आला सकाळी सूर्योदया श्री नाथ नंगे महाराज, प पू विश्वनाथ महाराज यांच्या व इतर देवातांच्या मूर्तिना अभिषेक करण्यात आला त्यानंतर विश्वजिवन ग्रंथाचे पारायण करण्यात आले दुपारी 1.00 वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात आले श्री नाथ नंगे महाराज गुरुदेव सेवा भजनी मंडळ डव्हा व कुरळा, ब्राह्मणवाडा जऊळका येथिल भजन मंडळानी भजन सादर केले.
महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला महाप्रसाद वितरण कारण्यापूर्वी संस्थानचे अध्यक्ष डॉ निवासराव मुंढे, यांनी संस्थान द्वारा राबाविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची व प्रस्तावित विकास कामाची माहिती दिली यावेळी ऍड सुभाषराव घुगे म्हणाले की हे संस्थान विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे या परिसरात अनेक विकास कामे करण्याची गरज आहे यावेळी संस्थान चे अध्यक्ष डॉ निवासराव मुंढे कोषाध्यक्ष कैलासराव देशमुख, डॉ घनश्याम सांगळे, कवीश्वर इंगळे,डॉ जगदीशराव घुगे कैलासराव मुंढे ऍड सुभाषराव घुगे आदी उपस्थित होते





Social Plugin