Ticker

6/recent/ticker-posts

मालेगाव जामा मस्जिद चौक (प्र.क्र.१४) येथील बंद गटारीची नियमित स्वच्छतेची मागणी,



*परिसरातील नागरिकनी दिले नगरपरिषद सीओ यांना निवेदन


मालेगाव प्रतिनिधी जावेद भवानीवाले

 मालेगाव, दि 30 वॉर्ड क्रमांक १४, जामा मस्जिद चौक, शादी खानाजवळील परिसरातील नाल्यांची संपूर्ण स्वच्छता व बंद पडलेल्या गटारी मोकळ्या करून , रस्त्यावर वाहत असलेल्या सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याकरिता मालेगाव नगरपरिषद सि ओ यांना फरिश्ता मानव सेवा संघटना तालुकाध्यक्ष नवजिश अख्तर मुक्तार अहमद यांनी दिले निवेदन त्यांनी निवेदनात म्हटले आहे की वार्ड क्रमांक 14 जामा मस्जिद चौक येथील नाल्या जामझाल्यामुळे नाल्याचा सदर सांडपाणी हा रस्त्यावरून वाहत आहे परिसरात सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. तसेच परिसरात डास उत्पत्तीचे प्रमाण ही वाढले आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी अनेक वेळा मालेगाव नगरपंचायतीला तोंडी आणि लेखी तक्रारी देऊन पण मालेगाव नगर परिषद तर्फे आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नसल्या कारणामुळे नाराजी व्यक्त करत 

आताच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर आताची परिस्थिती अशी झाली आहे की या घाणीमुळे लोकांमध्ये अनेक वेळा वाद निर्माण होऊन हाणामारीत रूपांतर होत आहे या समस्येचे गांभीर्याने विचार करून मालेगाव नगरपरिषदचे सी ओ यांनी स्वतः या समस्येची पाहणी करून वाड क्रमांक 14,च्या नाल्यांची स्वच्छता करून समस्याचे निराकरण करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तरी पण मालेगाव नगर परिषद प्रशासन या समस्याकडे कितपत लक्ष घालते या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.