या समंधित चौकशी करून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्यावर कार्यवाही कधी कराल. युवक काँग्रेस चे तहसीलदार यांना निवेदन
प्रतिनिधी :-सागर इंगोले
दी. 21जुलै रोजी देण्यात आलेल्या निवेदणाद्वारे तहसील कार्यालय झरी यांना युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष मा श्री राहुल द.धांडेकर यांचे राष्ट्रीय गळीत धlन्य तेलताल अभियान प्रामाणित बियाणे व वाटप कार्यक्रम सण 2025-2026 अंतर्गत महा dbt पोर्टेल वर ऑनलाईन अर्ज करणारे 153शेतकरी सदर योजनेकर्ता पात्र झाले होते. परंतु फक्त यानुसार 96 शेतकरी बांधवांना या योजनेतर्गत बियाणे वाटप करण्यात आलेले आहे. व या अशातच उर्वरित 57 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. व त्यानंतर झरी तालुक्यातील सर्व उर्वरित शेतकऱ्यांनी याबाबत कृषी कार्यालयाच्या खरेदी विक्रीतील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता
त्यांच्याकडून या सर्व शेतकऱ्यांना बियाणे, 2दिवसात येईल. किंवा 4दिवसात येईल आता किंवा गाडी यवतमाळ व चंद्रपूर येथून निघालेली आहे. याप्रमाणे येथील अधिकारी शेतकरी बांधवांना उडवा-उडावी चे उत्तर या शेतकऱ्यांना देत आहे. मात्र बियाणे शेतकऱ्यांना मिळालेले नाही. येथील संबंधित विभागामार्फत व वाटप केलेल्या यंत्रणेमार्फत शेतकऱ्याची फसवणूक झाली.
शेतकऱ्यांना एन पेरणीच्या वेळी तोंडावर सावकाराच्या पाया- पोटी लागून व्याजदराने बियाणे घेऊन पेरणी करावी लागली.या सम्पूर्ण प्रकरणात शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर बियाणे वाटप प्रकरणात दिरंगाई व लापरवाही करणाऱ्यांवर योग्य ती योग्य ती कार्यवाही करावी आशा प्रकारचे युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष्यांचे निवेदन तहसीलदार झरी जामणी यांना देण्यात आले..या समंधित अधिकारी यांची चौकशी करून चौकशी करून कार्यवाही कधी कराल असा प्रश्न युवक काँग्रेस कडून करण्यात आला.
Social Plugin