Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत कडून जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा सन्मान



                    #गुरुपौर्णिमेनिमित्त झालेल्या सन्मानाने शिक्षक झाले भावूक#

देगलूर: तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त येथील जिल्हा परिषद शाळेत ग्राम पंचायत कार्यालय आणि बालिका पंचायत राज समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व गुरुजनांचा सन्मान केला आणि त्यांच्या कार्याविषयी मनोगत मांडले.गुरुजनांचा हा सन्मान ग्राम पंचायत कार्यालय मार्फत होणे ही तालुक्यातील पहिलीच बाब असून सदरील सन्मानाला उत्तर देताना शिक्षकवृंद खूप भावनिक झाले होते.

यावेळी ईश्वर वाडीकर गुरुजींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करताना म्हणाले की माझ्या 17 वर्षाच्या कार्यकाळात मी हे पहिल्यांदाच अनुभवत आहे की ग्राम पंचायत कार्यालय मार्फत गुरुपौर्णिमा निमित्त सत्कार करण्यात येत आहे.यामध्ये मुख्याध्यापक अशोक देवकत्ते शिक्षक ईश्वर वाडीकर, भुमन्ना तेलगे, राहुल ढगे, रमाकांत वाघमारे, अंगनवाडी कर्मचारी गंगामणी दारलावार, हानमाबाई बरसमवार, शितल मटपती, मजुळा सिलमकुटवार, नागमणी बरसमवार, प्रणिता बरसमवार या सर्वांचा शाल,श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आला. 

यावेळी आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण बालिका पंचायत राज समितीच्या सचिव महादेवी दाणेवार यांनी केले. यानंतर इतर सदस्यांनी सर्व गुरुजनांचे ते करत असलेल्या अध्यापन कार्यासाठी आभार मानले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच संतोष पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की शिक्षक हा शाळेच्या चार भिंतीच्या आत देशाचे भविष्य घडवत असतात.म्हणूनच शिक्षकांना राष्ट्रनिर्माता असे म्हटले जाते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बालिका पंचायत राज सरपंच अंजली वाघमारे, उपसरपंच पुनम सुर्यवंशी, ग्रामसेवक महादेव दाणेवार, पोलिस पाटील अनिता बागेवार, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सपना काळीगवार, तंटामुक्त अध्यक्ष शिवकांत भुरळे, ग्रामपंचायत सदस्य रूद्राणी चैडके, महादेव कुंचगे, रितीका चिटकुलवार, हरीका तोटावार, महादेव गोशेट्टी, आश्विनी लोहार आदींनी परिश्रम केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनीका माळगे तर आभार अंजली वाघमारे यांनी मानले.