Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. अभय पाटील यांचा काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा



प्रतिनिधी – निळकंठ वसू

अकोला येथील प्रख्यात डॉक्टर आणि समाजसेवक डॉ. अभय पाटील यांनी काँग्रेस पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

डॉ. पाटील हे मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. अकोला जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. रुग्णसेवेत आणि सामाजिक कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा चर्चेचा विषय ठरत आहे.

महाराष्ट्र ग्रामीण न्यूज प्रतिनिधीने डॉ. अभय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वैयक्तिक कारण देत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, "मी काँग्रेसच्या विचारधारेसोबत असूनही, वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिला आहे. पुढील वाटचाल ही जनतेच्या सेवेसाठीच असेल."

डॉ. पाटील यांचा राजीनामा स्थानिक राजकारणात काय परिणाम घडवतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.