बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सण व संस्कृती यांचा ठेवा जतन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पुसेगाव येथे श्रावण महिना व नागपंचमी सणानिमित्त मेहंदी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये कुमारी दिशा चव्हाण हिने प्रथम क्रमांक तर राठोड मीनाक्षी हिने द्वितीय व कुमारी लावंड राधिका हिने तृतीय क्रमांक मिळवला .
गुणवत्तेबरोबर संस्कार जपणाऱ्या या शाळेत दर्जेदार शिक्षणाबरोबर क्रीडा तसेच सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्याकरता श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव,सचिव मोहनराव जाधव सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी, गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी श्री के. डी.पवार, श्री डी.पी. शिंदे, श्री एस. आर.पाटील, श्री जयंतराव जाधव, प्राचार्य श्री दत्तात्रय गोपने, श्री मोहनराव गुरव व सर्व शिक्षक सहकाऱ्यांनी स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थिनींचे कौतुक केले.सदर स्पर्धेसाठी हायस्कूल कला विभागाचे शिक्षक अजित काळे सर यांनी परीक्षकाची भूमिका पार पाडली.





Social Plugin