Ticker

6/recent/ticker-posts

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पारनेर येथे 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा



 अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ 

 सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पारनेर येथे 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र साहेबराव खरात अध्यक्ष राजधर्म शिक्षण प्रसारक मंडळ अंबड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गावचे प्रथम नागरिक प्राध्यापक दुष्यंत दादा जाधव सरपंच,माजी सरपंच अरुण दादा शिदे,विशाल भैय्या गाडेकर,कृष्णाची गाडेकर, आसाराम बोराटे काका,अशोक भिसे,दिनेश खांडेभराड,भानुदास मगरे,जीवन मगरे,मुस्ताक शेख,वाघमारे,अरुण हिरे,नारायण जाधव,श्री काळे सर,रविदादा जाधव,भगवान गाडेकर,सोनवणे, सुभाष सिंग,राजपूत,अशोक हिरे,माधव गाडेकर, दशरथ गाडेकर,तिडके विद्यालयाचे मुख्याध्यापक  अभिमन्यू गाढवे सर मान्यवर उपस्थित होते.

प्रथम गावातून प्रभात फेरी काढण्यात आली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान करून यात महात्मा ज्योतिराव,फुले सावित्रीबाई फुले,झाशी की राणी,राजगुरु,महात्मा गांधी, इत्यादी वेशभूषा परिधान करून क्रांतिवीराचे स्मरण केले.त्याचबरोबर तंबाखूमुक्त शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली.त्यानंतर संगीत कवायत बैठे,खडे हात घेण्यात आले.तसेच विद्यालयातील मार्च 2025 मध्ये उत्तीर्ण झालेल्या.विद्यार्थ्यांचा व पालकाचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला यात.कुमारी बोराटे राजकन्या राजेंद्र=84%,कुमारी सोनवणे दीक्षा राहुल= 85%,कुमारी जाधव रेणुका एकनाथ= 85.20%,कुमारी खरात विद्या भगवान=91.60 %

तसेच विद्यालयातील मा.विद्यार्थी पवन मंजित गाडेकर महापारेषण या पदावर निवड झाल्याबद्दल त्याचा व पालकाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच विद्यार्थ्यांची भाषणे झाली यावेळी विद्यालयातील शिक्षक राजेश भापकर, विश्वनाथ पोटफोडे,दत्ता शेरे आणि बंडू मामा व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ पोटफोडे तर आभार प्रदर्शन दत्ता शेरे यांनी केले..