प्रतिनिधी:निळकंठ वसू
अकोट, दि. 1 ऑगस्ट 2025:
जगतगुरू प्रतिष्ठान अकोटच्या नवीन कार्यकारिणीचा आज शिवसेना पक्षातर्फे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. अध्यक्ष धीरज गावंडे, सचिव सचिन फाटकर, शहर अध्यक्ष पुष्पक चेडे आणि शहर सचिव देवेंद्र गावंडे यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
हा सत्कार सोहळा शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री. दिलीप भाऊ बोचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी सौ. विजयाताई बोचे (नगरसेविका, अकोट), तालुका प्रमुख श्याम गावंडे, उपतालुका प्रमुख गोपाल म्हेसने, उपजिल्हा संघटक विक्रम जायले, शहर प्रमुख श्री. रंधे तसेच अन्य शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेच्यावतीने या नव्या कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून, सामाजिक कार्यात त्यांचे योगदान अधिक व्यापक व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
---
Social Plugin