प्रतिनिधी: निळकंठ वसू
आलेवाडी गावातील श्रीकृष्ण मंदिरात गोकुळ अष्टमी आणि दहीहंडी उत्सव गावातील मुलांनी आणि तरुणांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. पारंपरिक वेशभूषा, गोड भजनं आणि उत्साही दहीहंडी स्पर्धेमुळे संपूर्ण वातावरण आनंदमय आणि भक्तिमय झाले होते.
सकाळी श्रीकृष्ण पूजन, अभिषेक आणि आरतीने उत्सवाची सुरुवात झाली. महिलांनी पारंपरिक गीते गात भक्तिभाव व्यक्त केला. संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडण्यात आली. गावातील युवकांनी मानवरचना करून उत्साहात हंडी फोडली. लहान मुलांसाठी विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. गावकऱ्यांनी उत्सवात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. ग्रामपंचायत, महिला बचत गट आणि युवक मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.





Social Plugin