मालेगाव प्रतिनिधी:- जावेद धन्नू भवानीवाले
ग्रामीण विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून देण्यात येणाऱ्या महाआवास अभियान जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी यावर्षी मालेगाव पंचायत समितीने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाला असून १५ ऑगस्ट २५ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते मालेगाव पंचायत समितीचे बिडिओ रमेश सदाशिव कंकाळ यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य आवास योजना (ग्रामीण) यांचे यशस्वी पारदर्शक आणि गुणवंता पूर्व अंमलबजावणी केली यामुळे वाशीम जिल्ह्यात मालेगाव पंचायत समितीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असुन १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त वाशीम येथे जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते मालेगाव पंचायत समितीचे बिडिओ रमेश कंकाळ यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले आहे. या मध्ये मालेगाव तालुक्यात हनवतखेडा व पागरीकुटे या ग्रामपंचायतचा समाविष्ट आहे. यावेळी जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी , जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आर्पित चव्हाण तसेच वाशीम जिल्ह्यातील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते.





Social Plugin