Ticker

6/recent/ticker-posts

समुपदेशन केंद्र शहर पोलीस स्टेशन वाशिम परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न



वाशिम :- वाढत्या लोकसंख्येमुळे व दळणवळणाच्या सुविधेमुळे गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरण हे नष्ट होत चाललेले आहे एकीकडे माणूस हा श्रीमंती कडे वाटचाल करत आहे श्रीमंती पोटी पर्यावरणाच्या दृष्टीने गरीब होत चाललेला आहे याचे भान देखील नाही पर्यावरणाला प्रदूषण आणि शोषण पासून वाचवण्याचा प्रक्रियेला पर्यावरण संवर्धन म्हटले जाते, म्हणून मानवाचे वाटेकी वृक्षरोपण हेच नैसर्गिक संपत्तीचे दर्शन पर्यावरणाचे रक्षण आजच्या पिढीला समजावणे खूप आवश्यक आहे आज मानव प्रगतीमुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे प्राचीन काळात ऋषीमुनी आपल्या आश्रमामध्ये अनेक झाड लावत असत यामुळे त्यांचे आयुष्य निरोगी व अनेक वर्ष राहत असे आपण देखील आपल्या आरोग्य ही निरोगी जीवन जगण्याकरिता व येणाऱ्या पिढीला याचा फायदा व्हावा याकरिता आपण देखील जास्तीत जास्त संख्येने वृक्षारोपण लावणे पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे,खास करून आजच्या युवकांना युतींच्या सामाजिक संस्था युवा मंडळ शैक्षणिक संस्था व इतर सर्वांनी एकत्र संकल्प करून जास्तीत जास्त वृक्ष संकीर्ण वृक्षरोपण करून याची काळजी घ्यावी मानवाने आपल्या नवनवीन शोधांच्या अभिलाषी मुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचवणे सुरू केले आहे,

अशा काळात पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज झाली आहे,पृथ्वीवर अनेक प्राणी आपल्या अंतरासाठी वृक्षावर अवलंबून आहेत मनुष्य हवेत असलेला ऑक्सिजन हा प्राणवायू श्वासाद्वारे ग्रहण करतो अशा पद्धतीने वृक्ष मनुष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे,समुपदेशन केंद्र शहर पोलीस स्टेशन परिसरामध्ये वाशिम येथे वृक्षरोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहाने कार्यक्रम पार पडला,यावेळी उपस्थित शांतिनिकेतन महिला विकास समितीच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई आरु अनिता ताई धुमाळे, व सीमाताई राजगुरू तसेच शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक श्री.नायक सर इतर पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते, तसेच महिला समुपदेशन केंद्राचे समुपदेशक श्री.अरुण हिरवे व मोहिनी जुमडे उपस्थित होत्या,यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.