अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पारनेर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री अभिमन्यू गाढवे होते.व ज्येष्ठ शिक्षक श्री राजेश भापकर सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील इयत्ता आठवी,नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी"लोकशाहीर आण्णाभाऊ साठे" व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर भाषणे झाली.यात कु राजपूत तेजल, जाधव गायत्री,खरे राधिका,पवळ आवणी, डाखुरकर सुरज,सार्थक जाधव,चव्हाण समर्थ, मुळे श्रावणी इंगळे अमृता,जाधव भाविका, सातपुते अंकिता,पठाण अक्रम,शेख अल्तमश, इत्यादी मुलांनी भाषण केले.तसेच विद्यालयातील शिक्षकांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे विषयी बोलताना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळेत जाऊन ३५ कादंबऱ्या लिहिल्या यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे तसेच स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच या वाक्यासाठी प्रसिद्ध असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सामाजिक एकोपा करण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका होती असे विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक श्री अभिमन्यू गाढवे सर यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी,स्मशानातलं सोन या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी विद्यालयातील शिक्षक राजेश भापकर सर,विश्वनाथ पोटफोडे सर,दत्ता शेरे सर आणि बंडू मामा व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी कुमारी गाडेकर पार्वती तर आभार प्रदर्शन कुमारी राधा खरात हिने केले..





Social Plugin