Ticker

6/recent/ticker-posts

किशोरवयीन मुलींचा मेळावा संपन्न .



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

बुध ग्रामपंचायत व श्री नागनाथ विद्यामंदिर बुध यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत सभागृह बाजारपेठ बुध येथे संपन्न झाला . सरपंच सुजाता बोराटे व प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या मार्गदशनाखाली इ 8वी ते 10वी पर्यंतच्या किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन त्यांच्या रक्ताच्या चाचण्या हिमोग्लोबीन , शुगर, थायरॉईड तसेच विविध चाचण्या घेण्यात आल्या . भगवान सरवदे यांनी कॅम्प आयोजनाचा उद्देश व भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचाणी या संदर्भात मार्गदर्शन केले .

सरपंच सुजाता बोराटे  यांनी मुलींनी आहार , वाढत्या वयात होणारे शाररिकबदल , चक्कर येणे ह्या समस्या जाणवतात यासाठी वेळीच त्यावर उपाय योजना करण्यासाठी रक्ताच्या चाचण्या त्यावर उपचार करणे शक्य आहे . बुध उपकेंद्रच्या वैदयकिय अधिकारी डॉ सोनल जाधव यांनी या वयात शाररिक , मानसिक , भावनिक बदल होत असतात . या वयात मुलींना समजून घेऊन येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सर्वोतरी आपण प्रयत्न आरोग्यविभागा मार्फत केले जातील असे मत व्यक्त केले . या चाचण्यामुळे काही अडचणी आहेत का हे देखील समजतील हा शिबीर यशस्वी करण्यासाठी सिस्टर पुष्पा पवार , आशासेविका राणी कुंभार , विजया नलवडे, सुगंधा बोराटे , पल्लवी पोतदार , यांचे सहकार्य मिळाले . यावेळी सहशिक्षिका सविता भांगरे , पल्लवी कुंभार , अंजली कचरे यांनी देखील मार्गदर्शन केले . या शिबीरामध्ये बुध मधील ग्रामस्थ महिला आणि पुरुष यानी देखील सहभाग घेतला त्यांनीही विविध चाचण्या केल्या .