Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर तालुका मध्ये गाव वस्ती मध्ये दारू विक्री मोठ्या प्रमाणात.



प्रतिनिधी:- उत्तम पाईकराव 

आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी  तालुका हिमायतनगर  मधील  टाकराळा तांडा या गावांमध्ये तसेच तांडा वस्तीमध्ये दारू बंद करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती व मार्गदर्शन करताना तामसा पोलीस स्टेशन येथील पीएसआय खेडकर यांनी गावातील युवा पिढीला मार्गदर्शन केले .दारूमुळे अनेक जणांचे संसार उध्वस्त झाले.दारूमुळे अनेकांनी आपली प्राण गमावले दारूच्या व्यसनी आताची युवा पिढी फार मोठ्या प्रमाणात व्यसनी जात आहे .

भारतामध्ये बेरोजगारी वाढल्यामुळे युवकांना रोजगार नाही मिळत आपले शिक्षण पूर्ण करून रोजगार पण मिळत नाही आणि रोजगार न मिळाल्यामुळे युवक दारूच्या व्यसनी चालत आहे. हाताला काम नाही ,नोकरीने ,धंदा नाही, बरेच युवकांचे लग्न पण होत नाही त्यांना मुलगी द्यायला कोणी तयार नाही युवक शिकून घरी बसून बेरोजगार आहेत .

दारूमुळे खूप जणांचे घर उध्वस्त झाले दारूच्या व्यसनामुळे आपले जीवन कसे उध्वस्त होत आहे. असे खेडकर म्हणाले. टाकराळा गावचे ग्रामपंचायतचे सरपंच बाळासाहेब पाटील शिंदे आणि गावातली सर्व नवयुवक तसेच गावातील सर्व मंडळी उपस्थित होते . खेडकर पुढे असेही म्हणले यानंतर गावामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दारू चालणार नाही किंवा दारू विकणार नाही . जे कोणी दारू विकताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल .