बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
सातारा शहरांमधून आठ लोकापासून रक्तदानाची झालेली महायज्ञ २०१५ पासून अविरतपणे मोठ्या प्रमाणात काम करत असून रोटी बैंक या नावाजलेल्या राष्ट्रीय लेव्हलच्या संस्थेने धनबाद झारखंड याठिकाणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि पूर्व राज्यपाल रघुबर दास यांच्या हस्ते रणसिंगवाडीचे सुपुत्र आप्पासाहेब घोरपडे यांचा सन्मान करून गौरविण्यात आले.या सन्मान सोहळ्यासाठी नेपाळ, भूतान तसेच भारतातील प्रतेक राज्य मधील रक्तदान मध्ये काम करणारे समावेश होता.
आप्पासाहेब घोरपडे यांनी प्रत्येक घरातील कोणताही रुग्ण रक्त नाही म्हणून रागावू नये, ही मोहीम चालू केली होती. आज त्याचा वटवृक्ष पूर्ण भारतभर पसरलेला आहे. भारताबाहेरसुद्धा प्रत्येक ठिकाणी हर्ष फाउंडेशनचे नाव सन्मानानेच घेतले जाते.अशा पद्धतीने २०१५ पासून प्रत्येक ठिकाणी रक्ताची मोफत बँगची संकल्पना चालू करणारे अप्पासाहेब घोरपडे यांना झारखंडमध्ये ३ रा आंतरराष्ट्रीय अवार्ड दिलेला आहे.भारतीय सरकार पोस्ट ऑफिसने त्यांना १२ तिकीट देऊन सन्मानित सुद्धा केलेला आहे. यामुळे आप्पासाहेबांची निवड प्रेरणा देणारे लोकांमध्ये झालेली आहे.या आधी सुद्धा आप्पासाहेबांना ५ नॅशनल पुरस्कार आणि ३ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार तसेच २ जीवनगौरव पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत.
जो रक्तपेढीमध्ये जाईल त्यांना शंभर रुपये
नोव्हेंबरमध्ये दिल्लीमध्ये आप्पासाहेब घोरपडे यांनी रक्तदाता सुरक्षितताबद्दल सरकारच्यापुढे भूमिका मांडली होती. त्या भूमिकेचा विचार करून प्रत्येक राज्य रक्तदाता सुरक्षिता कसा राहील, यासाठी उपाययोजना करत आहे. याचाच प्रत्यय म्हणजे पश्चिम बंगाल सरकारने एप्रिल २०२५ ला रक्तदाता वेस्ट बंगालमध्ये कोणत्याही रक्तपेढीमध्ये जाईल तिथे त्यांना रिफ्रेशमेंटसाठी शंभर रुपये देण्यात यावे, असा जीआर काढला. हे यश एकट्या आप्पा साहेबांचे नसून पूर्ण रक्तदानमधील भारतवासीयांचे आहे, असे आप्पांचे मत आहे.





Social Plugin