नांदगाव :-- ईसाक शेख
जिद्द आणी इच्छा शक्ती असली कि एखादा माणूस कुठलाही शिखर सर करू शकतो. असेच काही जवळकी येथील रहिवासी डॉ. रईस अहेमद ग्यासूद्दीन यांच्या बाबतीत पाहायला मिळतो. कुटुंबात कोन्हीही उच्च शिक्षित नसून वडील जुन्या काळातील टेलर 7 भाऊ 2 बहीण असा मोठा परिवार पण शिक्षणा ची आवड असल्याने, 4थी पर्यंत चे शिक्षण जवळकी प्राथमिक उर्दू शाळेत झाले.पुडे 5 वी ची तुकडी नसल्याने बोलठाण प्राथमिक उर्दू शाळेत प्रवेश मिळवला 7वि पर्यंत शिक्षण पूर्ण बोलठण येथे झाले.आता पुन्हा इयत्ता 8 वी उर्दू नसल्या पंचायत झाली बाहेर गावी राहणे परवडणार नसल्याने इयत्ता 8 वी ला श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल बोलठाण येथे प्रवेश मिळाला. मग हायस्कूल आणि विद्यालयीन शिक्षण रोज 3 km पायी पर्वास करून छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे पूर्ण केले.
12 वी झाली आता पुढे काय ? कारण पुढील महाविद्यालयीन शिक्षण साठी जवळ पास 40km पर्यंत कुठेही कॉलेज नाही शिक्षण मात्र बंद नाही झाला पाहिजे म्हणून औरंगाबाद गाठले, पण राहायचा कुठे करायचा काय शिक्षण कसे पूर्ण करायचा असे अनेक प्रश्न समोर उभे ठाकले. मात्र हार मानायची नाही. मग कधी उपाशी,कधी पोटभर जेवण तर कधी अर्धपोटी जेवण. रात्र पाळीत कंपनीत काम करून सकाळी कॉलेज असा पर्वास करत आपले शिक्षण पूर्ण केले आज नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावर डॉ. रईस अहेमद ग्यासूद्दीन शेख हे एकमेव phd होल्डर आहेत त्यांचा जीवन एखाद्या चित्रपटेच्या कथेला लाजवेल असंच आहे
Social Plugin