Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष साईनाथ शिरोळे यांच्या प्रभागातील कामाचा वाढता आलेख पाहुन जनता खूश.



सगरोळी प्रतिनिधी ~ आमेटवार राजेश 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरातील विविध भागात आपली जनसामान्यांच्या सेवेत कार्य करणारे सर्व युवा वर्ग दिसत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी अद्याप निवडणुकांच्या तारखेचे चित्र स्पष्ट झाले नाही मात्र ईच्छुक नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत अशातच बिलोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष हे मात्र सदैव या ना त्या कामाने चर्चेत असतात नगर पालिकेचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून बिलोली शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नगर, इंदिरा नगर या प्रभागातुन नगर पालिकेचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न चालू आहे 

आमदारांसह मंत्र्याना भेटने व प्रभागातील अडी अडचणी सोडवणे यासह प्रभागाच्या विकास कामे आपल्या पदरी पाडून घेणे यात पटाईत असलेले शिरोळे आपल्या प्रभागाच्या विजेच्या समस्या, स्मशान भूमीच्या समस्या, रस्त्याच्या समस्या, नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या या गोष्टीचा सदैव पाठपुरावा करत कामे पुर्णत्वास नेली आहेत अशातच प्रभागातील वाढती लोकसंख्या आणि लहान मुलांच्या शैक्षणिक सामाजिक विकासाची गरज लक्षात घेता नव्या अंगणवाडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली या निवेदनात संबंधित भागांतील मुलांसाठी शैक्षणिक,पोषण आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तातडीने नवी अंगणवाडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. अंगणवाडी उपलब्ध झाल्यास, स्थानिक मुलांना घराजवळच शिक्षणाची संधी,पौष्टिक आहार आणि बालविकासाशी निगडीत विविध योजना सहज लाभतील,असे शिरोळे यांनी सांगितले.


शहरात नव्याने चार अंगणवाडी ची मागणी आपण महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे भेटुन केली आहे  अंगणवाडी वाढल्याने लहान बालकांसह गरोदर माताच्या पौष्टीक आहार संदर्भातील प्रश्न सुटतील नव्या अंगणवाडीच्या स्थापनेमुळे प्रभागातील शैक्षणिक आणि सामाजिक विकासाला गती मिळेल - साईनाथ शिरोळे