बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेटणे येथे श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिविंग पुसेगाव विभाग यांचे माध्यमातून आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान असणारी शेवगा या औषधी वनस्पती झाडांचे वाटप करण्यात आले .यावेळी शाळा केंद्रप्रमुख श्रीअजितराव निकाळजे यांनी विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना औषधी वनस्पती शेवगा याविषयी असणारे आयुर्वेदातील महत्त्व समजावून सांगितले. शेवगा या वनस्पती झाडाचे गुणधर्म तसेच जोपासना करणे विषयी मार्गदर्शन केले .यावेळी प्राथमिक स्वरूपात शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमासाठी आर्ट ऑफ लिविंगचे प्रतिनिधी म्हणून श्री अमृतराव नलवडे तसेच मुख्याध्यापक ,अंगणवाडी सेविका, शाळा व्यवस्थापन सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .सूत्रसंचालन मुख्याध्यापक संग्राम जाधव व आभार सौ शोभा माळवदे यांनी मानले





Social Plugin