![]() |
विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले |
मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव ता 16 - मालेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज विद्या मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्वातंत्र्य दिनानिमित्त ता 15 रोजी सादर करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगदंबा देवी, सरस्वतीदेवी, श्री संत गजानन महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले सावित्रीबाई फुले,महात्मा गांधी, भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्व तुळजारामजी गाभणे, स्व शाम गाभणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर स्वागत गीत शिक्षिका पूजा शर्मा व विद्यार्थिनींनी सादर केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे होते
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती लक्ष्मीबाई गाभणे, सौं निर्मला गाभणे,संचालिका अश्विनी गाभणे सौं रोहिणी गाभणे जावेद भवानिवाले, नाना भांडेकर, जरे पाटील, दीपक सारडा, चव्हाण उबेद मालवी, धनंजय दांडगे, सौं तिवारी आदी उपस्थित होते यावेळी प्रा गाभणे म्हणाले या शाळेत दर्जेदार शिक्षणासोबत विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले जातात यावेळी सौं अश्विनी गाभणे यांना शाळेत राबाविल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली कार्यक्रमात विविध स्पर्धा मध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक कपिल भालेराव शिक्षिका स्वाती सुरडकर शिक्षक ,सुजित अवचार, आकाश गाभणे, शिक्षिका सोनाली बेलहारकर,नीता भालेराव, माधुरी राऊत, श्वेता जयस्वाल,पुजा शर्मा,अनुपमा भांदुर्गे,राधा काळे आदीनी परिश्रम घेतले..कार्यक्रमाचे संचालन निता भालेराव यांनी प्रास्ताविक आकाश गाभणे यांनी आभार प्रदर्शन श्वेता जयस्वाल, यांनी केले.





Social Plugin