Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आर. जे. चवरे हायस्कूल व कॉन्व्हेंट शाळेत रॅली व विविध कार्यक्रम



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

आज दिनांक 29 ऑगस्ट शुक्रवार रोजी क्रीडा दिनानिमित्त आर जे चवरे प्राथमिक शाळा ,  हायस्कूल व कॉन्व्हेंटच्या वतीने मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापिकांच्या हस्ते हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांना संबोधित  करताना क्रीडाशिक्षक श्री.रोकडे सरांनी मेजर ध्यानचंद यांचे भारतीय हॉकी क्षेत्रातील अमूल्य योगदान स्पष्ट केले. त्यांची साधी जीवनशैली, खेळाप्रती असलेले समर्पण आणि जागतिक पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल करण्यातील वाटा याबाबत माहिती दिली.त्यानंतर जनजागृती रॅली काढण्यात आली. 

या रॅलीमध्ये प्रमुख उपस्थिती कारंजा तहसीलदार श्री झालटे साहेब, नायब तहसीलदार श्री हरणे साहेब, उपविभागीय अधिकारी श्री देवरे साहेब, इतर कर्मचारी, शिक्षक वृंद ,मुख्याध्यापिका व शाळेतील वर्ग 5 ते 10 चे विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीचा मुख्य उद्देश समाजामध्ये खेळाबद्दल जनजागृती निर्माण करणे हा होता. रॅलीची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे भारतातील ऑलिंपिकमधील खेळाडूंच्या प्रतिकृती तयार केलेल्या होत्या. तसेच पाच खंडांना दर्शवणारा ऑलिम्पिकचा पवित्र  ध्वज डौलाने फडकत होते. विद्यार्थी  सर्व खेळांचे साहित्य लोकांना आकर्षित करत होते. तसेच खेळाविषयी घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी लोकांमध्ये खेळाबद्दल जनजागृती निर्माण केली.  रॅलीदरम्यान “खेळांमुळे आरोग्य सुधारते”, “खेळाडू घडवा – देश घडवा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.या कार्यक्रमात वर्ग ५ ते १० पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. शालेय शिक्षकवर्ग, पालक व स्थानिक नागरिकांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.