Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा



 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

दिग्रस : तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेले कलगाव येथे नेहमी धार्मिक सण असो किंवा शासकीय उत्सव असो हे मोठ्या थाटात साजरे केले जातात. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा एकूण 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कलगाव येथील ध्वजारोहण सोसायटी अध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न. पोलीस चौकी, जिल्हा परिषद उर्दू शाळा येथील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळा येथील शाळेचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, यांच्या हस्ते तदनंतर ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण उपसरपंच यांच्यावतीने करण्यात आले.

 डी. व्ही. एस. पी. एम. विद्यालय येथील ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक, तसेच वसंतराव नाईक उर्दू हायस्कूल येथील ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते तर डॉ. एम पी हिराणी उर्दू हायस्कूल,, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, दारुल उलूम सराजूल इस्लाम मदरसा, येथील ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर सर्व शाळेतील विद्यार्थी आपापल्या बँड पथकासह ग्राम सचिवालय येथे एकत्रित आले. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन करण्यात आले. गावच्या सरपंच्या अस्मिता आकाश मनवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत घेण्यात आले. या 79 व्या स्वातंत्र्य दिनाला गावातील प्रतिष्ठित मंडळी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कृषी सहाय्यक उकळकर मॅडम, कृषी मंडळ अधिकारी सोनुणे, सर्व शाळेतील शिक्षक वृंद, गावातील युवक वर्ग मोठ्या आनंदाने उत्साहाने सहभागी झाले होते.