Ticker

6/recent/ticker-posts

श्री सचिन पोतेकर यांच्याकडून भैरवनाथ हायस्कूलसाठी सहा कम्प्युटर संच सप्रेम भेट



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित  श्री भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी   येथे मोठ्या उत्साहात ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण रणसिंगवाडी गावचे सन्माननीय ग्रामस्थ श्री सचिन पोतेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री सचिन पोतेकर यांनी भैरवनाथ हायस्कूल साठी सहा कम्प्युटर संच भेट म्हणून दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तंत्रज्ञानाची ओळख व्हावी ,जगाच्या स्पर्धेत त्यांनी टिकून राहावे यासाठी श्री सचिन पोतेकर यांनी शाळेत कम्प्युटर भेट म्हणून दिले. तसेच याप्रसंगी चेतन धनाजी घोरपडे व अजित बबन रणसिंग यांनी देखील शाळेसाठी पंखे व बल्ब भेट म्हणून दिले .

महिला सुरक्षा समितीतील सदस्य व बचत गटातील महिला यांनी देखील खारीचा वाटा उचलत शाळेसाठी मदत केली या प्रसंगी गावचे सरपंच श्री सुखदेव रणसिंग उपसरपंच श्री विठ्ठल मसुगडे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री समाधान फडतरे व सर्व सदस्य पोलीस पाटील श्री सुनील रणसिंग, तसेच श्री अजित रणसिंग, श्री चेतन धनाजी घोरपडे, श्री अविनाश रणसिंग, गजानन घाडगे ,सयाजी जाधव ,जगन्नाथ जाधव ,अशोक पोतेकर, सौ सुषमा मसुगडे, सौ सीमा मसुगडे मसुगडे ,विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, तसेच व्हॉ. चेअरमन, माता पालक संघाचे सन्माननीय सदस्य ,सर्व ग्रामस्थ, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते